पाचोरा (अमोल झेरवाल)
वरखेडी ता. पाचोरा येथील आयुष किरणजी जैन याची महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट असोसिएशन संघामध्ये निवड झाली आहे. उत्कृष्ट यष्टीरक्षक व फलंदाज असलेल्या आयुष जैन याची उदयपूर येथे दिनांक 12 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत निवड झाली. आहे. विशेष म्हणजे दिव्यांग असलेल्या आयुष्याची खुल्या गटातून आपली जागा निश्चित केली आहे. तो राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहे. उदयपूर येथे रवाना होण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे पाचोरा -भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल भाऊ शिंदे यांनी त्याला यशस्वी निवडीबद्दल आणि राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वीतेबद्दल शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीबापू पाटील, शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे क्रीडा शिक्षक सुशांत जाधव व बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूलचे क्रीडा शिक्षक अभिषेक भावसार उपस्थित होते.