हरेश्र्वर पिंपळगाव येथे आमदार किशोर पाटील यांनी प्रचाराचा नारळ वाढवला.
पिंपळगाव (हरे.) प्रतिनिधी
– राज्यातील महायुतीच्या लोक कल्याणकारी सरकारमुळे मतदार संघात रस्ते,वीज,पुल,पाणीपुरवठ्याची सार्वजनिक स्वच्छतेची सर्व कामे केली असून जनतेच्या आशीर्वादाने विजय संपादन करणार असल्याचा विश्वास.महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला.पिंपळगाव हरेश्वर येथून त्यांनी निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला.यावेळी श्री गोविंद समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करताना पुढच्या टर्ममध्ये शेत रस्त्यांचे प्रश्न सोडविणार असून एमआयडीसी व प्रक्रिया उद्योग उभरणार असल्याचा मानस व्यक्त केला. यावेळी भाजपाच्या खासदार स्मिताताई वाघ भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे डॉ.शांतीलाल तेली यांनी विचार मांडले. त्यानंतर आमदार किशोर पाटील खासदार वाघ यांच्यासह महायुती च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पिंपळगाव शहरातील सर्व भागात मतदारांशी संपर्क केला.
या प्रचार रॅलीमध्ये खा स्मिताताई वाघ,आमदार किशोर आप्पा पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे तालुकाप्रमुख सुनील पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,यांचेसह डॉ. शांतीलाल तेली,ज्ञानेश्वर सोनार,रमेश पोपट पाटील,सुनील पाटील,राहुल पाटील,वसंत गीते, विनोद महाजन,विनोद पाटील नंदू पाटील,इंदल परदेशी,किशोर पाटील,दीपक,पाटील,डॉ.शेखर पाटील,डॉ नितीन चव्हाण,बंटी राठोड,रवी गीते, संतोष पाटील,किशोर उभाळे,दीपक माळी यासह मोठ्या संख्येने भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रिपाई माहितीचे कार्यकर्ते सहभागी होते