पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार अमोल पंडीतराव शिंदे (क्र.७ निशाणी- शेतकरी) यांनी आज पाचोरा शहराच्या पश्चिम भागातील कॉलनीमध्ये प्रचार दौरा केला. यावेळी शहराच्या कान्या कोपऱ्यात शेतकरी पुत्र अमोल पंडीतराव शिंदे यांच्या घोषणांनी वसाहती दणाणून गेल्या. नवीन नागरी वसाहती भागात परिवर्तनाच्या घोषणेला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला.
पाचोरा -भडगाव चे लोकप्रिय अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा शहरातील कैलादेवी मंदिरापासून आज दिनांक 16 रोजी प्रचार रॅली ला सुरुवात झाली. शिवतीर्थ, एम एम कॉलेजच्या पाठीमागील नागरी वसाहती, जिजामाता कॉलनी, दुर्गा नगर, विवेकानंद नगर, पाटील नगर इत्यादी नागरी वसाहतींमधून जनतेला अभिवादन करीत ही प्रचार रॅली संपन्न झाली. रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी माता भगिनींनी अमोल शिंदे यांचे औक्षण केले. यावेळी ज्येष्ठांचे आशीर्वाद अमोल पंडितराव शिंदे यांना मिळाले. अनेक ठिकाणी जनतेने रॅलीचे उस्फूर्त स्वागत करत स्वागत करत अमोल शिंदे यांच्याशी हस्तांदोलन करत वार्तालाप केला. या रॅलीत शेकडो-बघिनी युवक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक घरांच्या प्रांगणात अमोल भाऊंच्या स्वागतासाठी विशेष रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचे जनतेने बोलून दाखवले. मागील निवडणुकीचा दाखला देत प्रचंड मोठी सहानुभूती जनतेने यावेळेस अमोल शिंदे यांच्या बाजूने व्यक्त केली.