पाचोरा
पाचोरा आणि भडगाव मतदार संघातील प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयांच्या निधीतून पायाभूत सुविधांची विकास कामे आमदार किशोर पाटील यांनी केलेली आहेत.अशा प्रकारे विकासाचे व्हिजन ठेवून काम करणाऱ्या नेत्याच्या मागे जनता असते त्यामुळे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रिपाई महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील तिसऱ्या टर्मसाठी निवडून येतील असा विश्वास खासदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केला.पिंपळगाव येथे श्री गोविंद समर्थ महाराज मंदिरात किशोर पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील श्री गोविंद महाराज संस्थानचे मठाधिपती शिवानंद महाराज संस्थांनचे अध्यक्ष शामराव कृष्ण महाजन,सेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे तालुकाप्रमुख सुनील पाटील बाजार समितीचे सभापती गणेश पाटील डॉ शांतीलाल तेली आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना खा स्मिताताई यांनी भाजपा शिवसेना माहितीबद्दल बोलताना महायुती अभेद्य असून भाजपा बंडखोरी बाबत चर्चाना काहीही अर्थ नाही असे सांगितले.लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे विशेषतः भाजपाचे सर्व कार्यकर्ते किशोर यांच्या मागे भक्कमपणे उभे राहतील असे त्यांनी सांगितले.