नगराज पाटील
पाचोरा
पाचोरा : गाव ग्रामपंचायतीला गावाचा गाडा हाकणारा सरपंच सोबत शासनाचा प्रतिनिधी म्हणून काम पाहणारा ग्रामसेवक हे शासकीय योजनांचा शेवटच्या घटकाच्या लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचावी यासाठी ग्राम स्तरावर कामे करतात काम करत असताना बऱ्याच ठिकाणी लाभार्थ्यांकडून शासकीय योजना पदरात पाडून देण्यासाठी चिरीमिरी घेताना अँटी करप्शन मध्ये अडकताना आपल्याला दिसून येत असतात. बऱ्याच वेळेस सरपंच व ग्रामसेवकांमध्ये तू तू मै मै ही आपल्याला पहावयास मिळते असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील एका ग्रुप ग्रामपंचायतीच्या कामावर असलेल्या ग्रामसेवकाला शासनाच्या घरकुल योजना विषयी वेळोवेळी विचारना करीत लाभार्थ्याचा संताप अनावर होऊन संबंधित लाभार्थ्याने कामावर हजर असलेल्या ग्रामसेवकाच्या कानशिलात लगावली हा विषय सरळ पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी घडल्याने लाभार्थी व ग्रामसेवक संघटनेचे काही पदाधिकारी यांनी मध्यस्थी करून लाभार्थ्याला पोलीस स्टेशनमध्ये ग्रामसेवकाचे पाय धरून मला माफ करा अशी चुकी पुन्हा होणार नाही माझ्यावर राग संतापाने हा प्रकार झाला असल्याचा मनस्ताप कबूल करत या वादावर पडदा पडला घरी सर्वपित्री अमावस्या असल्याने सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत गावातील महिला पोलिस पाटील यांच्या पतीने ही सहभाग घेऊन हा विषय लवकर आटोक्यात घेऊन शेवटी ग्रामसेवकाने त्या कानशिलात लावलेल्या नागरिकांकडून लेखी घेऊन विषय मिटवला.कानशिलात मारणारा कानशिलात मार खाणारा हे एकाच समाजातील व्यक्ती असल्याने या विषयाची एकच चर्चा दिवसभर शहरात दिसून आली.