पाचोरा
प्रशासनास निवेदन
परभणी शहरात मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय ते बस स्टँड रोड येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा आहे. त्या ठिकाणी असलेल्या भारतीय संविधानाच्या संदेशक प्रतिकृतीची एका माथेफिरू कडून मोडतोड होऊन संविधान विरोधी घोषणाबाजी करण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर घटनेचा पाचोर्यात निषेध नोंदवण्यात आला.
मुख्यतः शहरात प्रशासकीय व मुख्य चौक परिसरात अशा पद्धतीने घटना घडते व तेही भारतीय संविधानाच्या 75 व्या अमृत महोत्सवाच्या सुरुवातीस अशा पद्धतीने विकृत व अवमानकारक कृत्य होत असेल तर आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात खऱ्या स्वातंत्र्यात आहोत काय, हा खरा प्रश्न उभा राहतो. सध्या शहराशहरात जे मोर्चे निघत आहे त्यामुळे कुठेतरी समाज मनात तेढ निर्माण तर होत नाही ना ? हे देखील तपासणी गरजेचे झाले आहे, त्यामुळे सदर घडलेल्या घटनेची मुळ पार्श्वभूमी तपासून सक्षम यंत्रणे कडून चौकशी होऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी समस्त संविधान प्रेमी व आंबेडकर प्रेमी जनता मागणी करीत आहे.