पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल रो. राजेंद्रसिंग खुराणा यांनी नुकतीच पाचोरा क्लबला भेट देऊन क्लबच्या कामकाजाच्या आढावा घेतला. याप्रसंगी त्यांचे समवेत सौ. गिन्नी खुराणा व उपप्रांतपाल अभिजीत भंडारकर उपस्थित होते.
याप्रसंगी स्वप्निल शिल्प रेसिडेन्सी हॉल पाचोरा येथे आयोजित क्लब मीटिंगमध्ये रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे अध्यक्ष रो. डॉ. पवनसिंग पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. रोटरी क्लब सेक्रेटरी शिवाजी शिंदे यांनी चालू वर्षाच्या कामकाजाचा आढावा प्रांतपाल खुराणा यांचे समोर सादर केला. याप्रसंगी बोलताना प्रांतपाल राजेंद्रसिंग खुराणा यांनी पाचोरा भडगाव क्लबच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. पुढील काळासाठी महत्त्वाच्या सूचना व दिशा निर्देश क्लबला दिले. उपप्रांतपाल अभिजीत भंडारकर यांनी रोटरी सदस्यांना विविध रोटरी प्रोजेक्ट बद्दल माहिती सांगून अमळनेर येथे होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल सूचना दिल्या.
यानिमित्ताने पाचोरा येथील आधारवड या सेवाभावी संस्थेला प्रांतपाल राजेंद्र सिंग खुराणा यांच्या हस्ते “कम्युनिटी सर्विस अवार्ड” ने गौरवण्यात आले. सौ पिंकी जिंदोडिया यांना रोटरी क्लब सदस्यत्व देण्यात आले.
या कार्यक्रमाला पाचोरा येथील रोटरी क्लबचे सदस्य भरत सिनकर, चंद्रकांत लोढाया, निलेश कोटेचा,रुपेश शिंदे, डॉ. अजयसिंग परदेशी, डॉ.अमोल जाधव, डॉ. पंकज शिंदे डॉ.बाळकृष्ण पाटील, प्रदीप पाटील, डॉ. मुकेश तेली,डॉ. तौसिफ खाटीक, रावसाहेब पाटील,शरद मराठे , गौरव चौधरी,गिरीश दुसाने, अरुणा उदावंत, डॉ. गोरख महाजन डॉ. राहुल काटकर डॉ. वैभव सूर्यवंशी, डॉ. विशाल पाटील डॉ. सिद्धांत तेलीआदी रोटरी सदस्य सहपरिवार उपस्थित होते. रो. चंद्रकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.