पाचोरा (अमोल झेरवाल)
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन ज्यांच्या जन्मदिनाचे अवचीत्य साधून आज दिनांक 6/10/2024 रोजी नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम यांचे तर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बहुमोल कार्य केल्याबद्दल ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव हरेश्वर चे उपप्राचार्य पी ओ चौधरी व उल्हास पाटील, ग्राम विकास विद्यालय यांना ” डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार” धुळे, येथे आज प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रातील उत्तम कामगिरी केलेल्या शिक्षकांचा बहुमान म्हणून या पुरस्काराने सन्मानित केले जाते. हा पुरस्कार पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास मंडळ संचलित ग्रामविकास हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांना मिळाल्याने पिंपळगाव हरेश्वर व परिसराच्या शिरपेच्यात मानाचा तुरारोला आहे.
या दोघांना हा पुरस्कार मिळाल्याने सर्व ग्राम विकास मंडळ संचलित सर्व शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील आप्तेष्टांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या पुरस्काराबद्दल पी ओ चौधरी व उल्हास पाटील यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक पी जे तेली तसेच ग्राम विकास मंडळ अध्यक्ष सचिव व संचालकांकडून शुभेच्छा व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आला.